रत्नागिरीत 1616 रूग्णांची कोरोनावर मात

503

रत्नागिरी जिल्ह्यात 96 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2487 झाली आहे. दिवसभरात 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील 53 वर्षीय महिला रुग्ण, शिवाजीनगर, रत्नागिरी येथील 68 वर्षीय महिला रुग्णांचा तसेच  पुर्णगड, रत्नागिरी येथील 61 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच खेर्डी, चिपळूण येथील 86 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू  झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 87 झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 10, कोव्हीड केअर सेंटर घरडा 5, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 2, उपजिल्हा रुग्णालय कामथे 2 अशा 19 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1616 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या