रत्नागिरीत महावितरणची 81 कोटींची थकबाकी, वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान

लॉकडाऊनच्या काळापासून महावितरणची हजारो कोटींची बिले थकली आहेत़. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीजबिलांची 81 कोटी रुपयांची थकबाकी असली तरी 65 टक्के लोकांनी वीजबिले भरली आहेत़. संपूर्ण राज्याचा विचार केला असता रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात वीजबिले भरणाऱ्यांची संख्या अन्य जिल्ह्यांपेक्षा चांगली आहे़.

लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ बिले आल्यानंतर अनेक ग्राहकांनी बिले भरली नाहीत़. त्यामुळे महावितरणची हजारो कोटी रुपयांची बिले थकीत राहीली़. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनपासून 55 हजार 845 ग्राहकांनी वीजबिले भरली नाही़. ही रक्कम 81 कोटी 31 लाख रुपये आहे़. या थकीत बिलाव्यतिरिक्त ऑक्टोबर महिन्यात महावितरणची बिलाच्या रक्कमेची मागणी 72 कोटी 42 लाख रुपये होती़. त्यामुळे थकीत वीजबिल वसुलीचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे़. थकीत वीजबिलांमध्ये उद्योगधंद्यासाठी वापरण्यात येणार्‍या वीजबिलांची संख्याही 8 कोटी 85 लाखांच्या घरात आहे़. तसेच रत्नागिरी विभागातील 265 उच्चदाब वीज ग्राहकांकडून 32 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम अपेक्षित होती़.

चौकट : महावितरणमध्ये 627 पदे रिक्त

महावितरणमध्ये रत्नागिरी विभागात 1469 पदे मंजूर आहेत़. त्यामध्ये 842 पदे भरली असून 627 पदे रिक्त आहेत़. रिक्त पदांचे प्रमाण 42.68 टक्के आहे़. त्यामध्ये तांत्रिक कर्मचार्यांची 1248 पदे मंजूर असून त्यापैकी 673 पदे भरली आहेत़. 575 पदे रिक्त आहेत़. अतांत्रिक कर्मचार्यांची 221 पदे मंजूर असून 169 पदे भरली आहेत़. 52 पदे रिक्त आहेत़

आपली प्रतिक्रिया द्या