रत्नागिरीत कोरोनाचे आणखी चार रूग्ण

455

रत्नागिरी जिल्ह्यात आज शनिवारी कोरोनाचे आणखी चार रूग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 86 वर पोहचली आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिरज येथे पाठवलेल्या तपासणी नमुन्यांपैकी चार अहवाल प्राप्त झालेले आहेत हे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील तीन रुग्ण कामथे येथे तर एक रुग्ण कळंबणी येथे संस्थात्मक क्वारंटाइन होता. कामथे येथील तीन रुग्ण चिपळूण तालुक्यांतील कापरे येथील रहिवासी असून कळंबणीतील रुग्ण हा संगमेश्वर येथील रहिवासी आहे. हे चारही जण मुंबईतून रत्नागिरीत आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या