जमावबंदी आणि कर्फ्यूचे आदेश मोडणाऱ्या ९ जणांवर गुन्हे.

जमावबंदी आणि कर्फ्यूचे आदेश मोडल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यात नऊ गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये आज दापोलीत दुकाने सुरु ठेवणारे दोघेजण व रत्नागिरीत मशिदीत नमाजला पाच पेक्षा अधिक लोक गेल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जमावबंदी आणि कर्फ्यू नागरी भागात 31 मार्च पर्यंत जारी असून कुटूंबातील एकच व्यक्ती घराबाहेर पडू शकते.

उद्यापासून पोलीस यंत्रणा नियमांचे काटेकोर अमंलबजावणी करणार असून अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन गायकवाड यांनी केले.जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी उद्यापासून बस,खासगी ट्रव्हल्स बंद होणार आहेत.गेल्या पंधरा दिवसात पुणे आणि मुंबईतून आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांनाही होम कॉरंटाईन करण्यात येणार आहे.आजूबाजूचे कोण नागरिक पुण्या-मुंबईतून आले असतील तर त्यांनी तात्काळ कळवावे असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे.किरणा मालाच्या दुकानांना पार्सल सुविधा देण्यासाठी आम्ही सुचविणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे यांनी ग्रामीण भागात नागरी कृती दल स्थापन करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे.ते कृती दल बाहेरून आलेल्या लोकांना होम कॉरंटाईन करण्याबाबत सल्ला देत आहेत.

कोकण रेल्वेच्या गाड्या बंदकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या सर्व एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या दिनांक ३१ मार्च पर्यंत बंद रहाणार आहेत.गाड्या बंद केल्यामुळे जिल्ह्यात बाहेर गावाहून येणारी गर्दी कमी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या