रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरावर सुरक्षा रक्षक तैनात

2814

लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवर मत्स्यविभागाने सागरी सुरक्षा रक्षक यांच्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिरकरवाडा बंदरावर नेहमी छोटी वाहने व माणसे यांची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते. पण सागरी सुरक्षा रक्षकांनी यावर चोख नियंत्रण ठेवले आहे. सद्यस्थितीत बंदरावर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे.

मिरकरवाडा, भगवती बंदर तसेच जिल्ह्यातील प्रमुख मासळी उतरवण्याच्या बंदरावर सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता शासनाने संचारबंदी लागू केली असली तरीही मुंबईतून सागरी मार्गाचा वापर करून बोटीने काही लोक कोकणात येत आहेत. हे रोखण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षक हे 24 तास आपले कर्तव्य बजावत आहेत.

रत्नागिरी विभागामध्ये कोरोनाचा प्रसार थांबवणे व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे यासाठी मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी काम करत आहेत. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी एन. व्ही. भादुले, रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जे. डी. सावंत, परवाना अधिकारी रत्नागिरी डॉ. रश्मी आंबुलकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक तुषार सुदय करगुटकर हे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या