मरणानंतर सरणाची चिंता मिटली, मृत कोरोनाबाधित व्यक्तीवर रत्नागिरीतच अंत्यसंस्कार होणार

676

कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर रत्नागिरी शहरात अंत्यसंस्कार करण्यास विरोध होत होता. त्यावर आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून कोरोमाबाधित मृत व्यक्तीवर रत्नागिरीतच अंत्यसंस्कार होतील असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे आता कोरोनाबाधिताच्या मरणानंतर सरणाची चिंता मिटली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावरील अंत्यविधी रत्नागिरी शहरातील स्मशानभूमीत करण्यास विरोध झाला होता. कोरोनाबाधिताच्या मरणानंतर सरणाची चिंता निर्माण होत होती.दोन वेळा अशा घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी एक बैठक बोलावली होती. बैठकीला नगराध्यक्ष प्रदीप साळवी,आरोग्य सभापती राजन शेट्ये उपस्थित होते. बैठकीत कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावरील अंत्यसंस्कार रत्नागिरीत होतील असा निर्णय झाला.

आपली प्रतिक्रिया द्या