रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढायला सुरूवात केली आहे.वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लॉकडाऊन मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शनिवार आणि रविवारी जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. त्यानंतर मंगळवारपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस दुपारी बारा वाजेपर्यंत कोसळत होतो. पावसामुळे जिल्ह्यातील नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत. शहरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. 1 जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ८५१ मिमी पाऊस पडला आहे

आपली प्रतिक्रिया द्या