रत्नागिरीत हॉटेल्स, रेस्टॉरन्ट 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार, पर्यटन व्यवसायाला चालना

दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने जिल्ह्यात निर्बंध कायम होते. त्यामुळे पावसाळी पर्यटनाला खीळ बसली होती. आता रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने जिल्हा तिसऱ्या स्तरात आला आहे. आता रेस्टॉरंटनाही सकाळी 9 ते  सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्या आली आहे. त्यामुळे आता पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला आता तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले असून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अन्य सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते  दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील. रेस्टॉरंट सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के आसनक्षमतेनुसार सुरु ठेवता येतील. दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत पार्सलसेवा आणि घरपोच सेवा सुरु ठेवता येतील असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

नव्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणे आणि मैदाने सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. खासगी आस्थापना आणि कार्यालये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शासकीय कार्यालयांसहित खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.

व्यायामशाळा बाहेरील मोकळ्या जागेत सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. मेळावे किंवा करमणूकीचे कार्यक्रम सभागृहाच्या 50 टक्के आसनक्षमतेत सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने घेण्यात येतील.

बांधकाम कामगारांची राहण्याची व्यवस्था असेल अशा ठिकाणी बांधकामे सुरु करण्यात येतील. त्यांना दुपारी 4 वाजता कामाच्या ठिकाणी आणून सोडणे आवश्यक राहील.

कृषी आणि कृषीपुरक सेवा सोमवार ते रविवार सकाळी 9 ते 4 यावेळेत सुरु राहतील. केशकर्तनालय, ब्युटीपार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. अंत्ययात्रेसाठी 20 लोकांना परवानगी असून लग्नकार्यासाठी 50 लोकांची उपस्थिती बंधनकारक राहणार आहे. लग्नकार्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या