रत्नागिरी,कळंबणी,संगमेशवरातील 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह

633

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथील नऊ,कळंबणी येथील सात आणि संगमेश्वर येथील तीन जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व 19 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या 19 जणांना संशयित म्हणून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासर्वांचे स्वॉब पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सायंकाळी यासर्व 19 जणांचे अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात सध्या होम क्वॉरंटाईनची संख्या 735 आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पासून दुचाकी बंदी लागू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी काटेकोर अंमलबजावणी झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागात रस्त्यावरील रहदारी कमी झाली होती. दुचाकी बंदी नियम मोडणाऱ्या 32 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्याचबरोबर रोजंदारीवरील कामगारांची नोंद घेण्यात आली असून जिल्ह्यात 474 कामगार रोजंदारीवर काम करत आहेत.त्यापैकी भोजन आणि रहाण्याची व्यवस्था नसलेले 21 कामगार आहेत.खेड येथील निवारा केंद्रात 12 आणि दापोलीत 9 जणांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेच्या पार्सल गाड्या धावणार
लॉगडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि अन्नधान्य,औषधे यांची टंचाई निर्माण होऊ नये याकरिता कोकण रेल्वे पार्सल गाड्या सुरु करणार आहे.यागाड्यातून महत्वाच्या वस्तूंची वाहतूक होणार आहे.पार्सलसाठी इच्छूक संस्था किंवा व्यक्तीनी रत्नागिरीतील 8668699798/9004474411, कारवारमधील 7483804199/9004477511 आणि मंगलोरमध्ये 7483804199/9686656210 वर संपर्क साधावा असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या