
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1 ते 8 जुलै दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे़. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत़. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असा आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जाहीर केला़.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 599 वर पोहोचली आहे़. काही ठिकाणी प्रवासाचा इतिहास नसतानाही कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत़. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग आणखी पसरु नये याकरीता हा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे़.
लॉकडाऊनच्या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमता येणार नाही़. मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे़. अत्यावश्यक सेवेतील दुकानावर एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक उभे राहणार नाहीत़. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे़. या सर्व सूचनांचे पालन करा असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे़.























































