रत्नागिरी – लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होताच बाजारपेठेत गर्दी

प्रातिनिधीक फोटो

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने सकाळी 9 वाजल्यापासून बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु झाली. 9 दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर बाजारात खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी केली होती.

3 ते 9 जून दरम्यान रत्नागिरीत कडक लॉकडाऊन पाळला जात होता़. त्यानंतर आजपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने आज सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतूक सेवा 50 टक्के क्षमतेने सुरु होती. केशकर्तनालये, व्यायाममाळा, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर ही सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सुरु होती. 7 दिवसांच्या लॉकडाऊननंतर आज अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडल्यानंतर नागरीकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे अनेकांनी आजच जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यावर भर दिला.

आपली प्रतिक्रिया द्या