रत्नागिरीत आणखी 13 कोरोनाबाधित

642

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 13 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 145 वर पोहचली आहे. मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

मिरज वरून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 13 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापूर्वी ३७ रूग्ण उपचारानंतर बरे झाले त्यांना घरी सोडण्यात आले आहे. चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवार दुपारनंतर बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या