रत्नागिरीत आणखी 35 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, एकूण रुग्णसंख्या 912

524

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 35 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे एकूण पॉझिटिव्ह संख्या 912 इतकी झाली आहे. यात एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यूनंतर आलेला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 32 झाली आहे. सदर 70 वर्षीय महिला रुग्णास रजिवडा येथून काल जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या महिलेचा आज मृत्यू झाला. सदर महिलेचा कोणताही प्रवासाचा इतिहास नसून स्थानिक संसर्ग देखील नसल्याची माहिती आहे. 35 अहवालामध्ये रत्नागिरी 2, कामथे 14, कळंबणी 5,गुहागर 6आणि दापोलीत 8रूग्ण सापडले आहेत.आतापर्यंत 627 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या