शिवसेनेकडून प्रदीप साळवी 10 डिसेंबरला अर्ज भरणार

625

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी शिवसेनचे उमेदवार प्रदीप साळवी मंगळवार 10 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणूकीसाठी 29 डिसेंबरला मतदान होणार असून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे.

शिवसेनेने प्रभागनिहाय बैठका घेत प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे उमेदवर तालुकाप्रमुख प्रदीप साळवी हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी रत्नागिरी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद आणि प्रभारी नगराध्यक्षपद सांभाळले असून त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या