नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार, उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठका

1060

रत्नागिरी नगराध्यक्षपदाची पोट निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांच्या उपस्थिती झालेल्या प्रभागनिहाय बैठकांमध्ये नगरपरिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला.

शहरातील प्रभाग क्र.06 मधील शिवसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित तालुकाप्रमुख आणि प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप,शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उपशहरप्रमुख भाऊ देसाई, प्रशांत साळुंखे, महिला शहर संघटक मनीषा बामणे, शहर संघटक प्रसाद सवांत,युवासेना शहर युवाधिकारी अभिजीत दुडे,जेष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्थानिक नगरसेवक मधुकर घोसाळे, नगरसेविका श्रद्धा हळदणकर, विभागप्रमुख बारक्या हळदणकर, महिला विभागप्रमुख प्रिया साळवी, उपविभागप्रमुख समीर कदम, शाखाप्रमुख परशुराम खानविलकर, तसेच सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत आमदार उदय सामंत यांनी नगराध्यक्ष पोटनिवडणूकीबाबत मार्गदर्शन करताना पोटनिवडणूकीत शिवसेनेचा विजय होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला. प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी रत्नागिरी शहरातील विकास कामांबाबत माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या