
वांझ मोहोरामुळे यंदा फळधारणा झाली नाही.वाढत्या तापमानामुळे उरलासुरला मोहोर करपून गेला.
हवामानातील बदलामुळे यंदाही आंब्याचे नुकसान झाले आहे. घटलेले आंबा उत्पादन आणि नुकसानीवर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवार 10 मार्चला सकाळी १० वाजता जयेश मंगल पार्क रत्नागिरी येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जीआय मानांकन नोंदणी करण्यात येणार आहे.जी आय मानांकन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने केले आहे.
यंदाच्या हंगामात वांझ मोहोर आल्याने फळधारणा झाली नाही. हा मोहोर करपून गेला.त्यामुळे यंदा अतिशय अल्प प्रमाणात आंबा उत्पादन होत असल्याने बागायतदार चिंतेत सापडले आहेत.यंदा हापूस आंबा उशीराने बाजारात येणार आहे.काही कलमांवर अजूनही फळधारणा न झाल्याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे.वाढत्या तापमानामुळे मोहोरही करपून जात आहे.यासंदर्भात सर्व आंबा बागायतदार आणि शेतकरी एकटवणार आहेत.गेली अनेक वर्षे कोकणातील हापूस आंबा संकटात सापडला आहे.सरकारकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने हा बागायतदार आता रस्त्यावर आला आहे. मंगळवारी १० मार्चला आंबा बागायतदारांची महत्वपूर्ण बैठक होणार असून पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.


























































