Ratnagiri News – मुगीज येथे 70 जीवंत गावठी बॉम्ब सापडले, रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई

खेड-मंडणगड रस्त्यावर मौजे मुगीज येथे गस्त घालत असताना एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 70 जीवंत गावठी बॉम्ब सापडले असून त्याच्याकडून 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश राम जगताप (33) याच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानंतर त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 70 जीवंत गावठी बॉम्ब आढळून आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चारचाकी गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. एकूण 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दीपराज पाटील, सत्यजीत दरेकर आणि अतुल कांबळे यांनी केली.