Ratnagiri News – खालगाव बालेकिल्ला राखणारच, मशाल पेटणार! विनोद शितप,सुरेश कारकर आणि स्वाती गावडे आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांच्या विरोधात जोरदार लढा देत आहेत. खालगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार विनोद शितप, पंचायत समिती गण खालगाव मधील उमेदवार स्वाती गावडे, करबुडे मधील सुरेश कारकर यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

खालगाव जिल्हापरिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात गद्दारांना धडा शिकवून पुन्हा भगवा फडकवू, असा विश्वास विनोद शितप यांनी व्यक्त केला आहे.उमेदवार सुरेश कारकर म्हणाले की,आमच्या समोर धनशक्ती लढत आहे मात्र आम्ही निष्ठा आणि जिद्दीने लढत आहोत. प्रचारात विभागप्रमुख चंद्रकांत साळवी, राजू पाचकुडे,नंदकुमार पाचकुडे, अक्षय बारगुडे ,महेश रामगडे,अमित शितप ,मंगेश साळवी,राजेंद्र सीळवी ,संतोष मायंगडे,दीपक शितप, महेश घाणेकर,विलास सोनवडकर, गोपाळ घाणेकर दिलीप शितप उपस्थित होते.