रत्नागिरीत पेट्रोलपंपावर फक्त दुचाकींनाच पेट्रोल

440

रत्नागिरीत संचारबंदी लागू करण्यात आली असून पेट्रोलपंपावर दुचाकींना सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सांयकाळी 4 ते 6 वा.दरम्यान पेट्रोल देण्यात येणार आहे. नऊ प्रकारच्या शासकीय वाहनांना दिवसभर पेट्रोल-डिजेल देण्यात येणार आहे. पेट्रोपंप सकाळी 9 ते सायंकाळी 6 राजापर्यंत सुरु रहाणार आहेत अशी माहिती फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.

रत्नागिरीत वाहनचालकांकडून 6 लाखाचा दंड वसूल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करून अत्यावश्यक सुविधेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नका असा अशी विनंती सरकार करत असतानाही अनेक जण दुचाकी आणि चारचाकी घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. 1614 वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत 6 लाख 29 हजार 600 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सर्वाधिक कारवाई हॅल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर झाली आहे.गाडीचे अपुरे कागदपत्रे असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली.981 दुचाकीस्वारांकडून 4 लाख 90 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.सीटबेल्ट नसलेल्या वाहनचालकांकडून 27 हजार 600 रूपयांचा दंड आकारण्यात आला.कागदपत्रे नसलेल्या 245 वाहनचालकांकडून 49 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.आजही पोलिसांनी नाकाबंदी करून कामाशिवाय बाहेर पडलेल्यांना परत पाठवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या