रत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु

646

रत्नागिरीत मटका धंद्यावर पोलिसांनी सुरु केलेली कारवाई ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमध्ये थंडावली होती. त्याचा गैरफायदा घेत मटका व्यसायिकांनी आपले दुकान जोरात चालू केले असताना पोलिसांनी मटका धंद्यावर पुन्हा एकदा कारवाई सुरु केली. जयस्तंभ येथील एका मटका धंद्यावर पोलिसांनी धाड टाकली. जयस्तंभ येथील शिर्के प्लाझा येथे रत्नागिरी शहर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी 2692 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले तसेच रवींद्र उर्फ राजू पिलणकर याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा मटका व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. महिनाभर कारवाई थंडावल्यामुळे मटका व्यावसायिकांचे पेव फुटले होते. मात्र, पोलिसांनी पुन्हा धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या