सावर्डेत 75 हजारांचा गुटखा जप्त

प्रातिनिधिक फोटो

मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेत एका जनरल स्टोअर मध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा सा आढळूनठा आला आहे. गुटखा बंदी असताना जनरल स्टोअर मध्ये गुटख्याचा साठा आणि विक्री सुरू असल्या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विजय पाचपुते यांनी ही कारवाई केली. आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सावर्डे येथील जनरल स्टोअर मध्ये धाड टाकण्यात आली. या ठिकाणी 75,645 रुपयांचा गुटखा, तंबाखू चा साठा आढळून आला. यानुसार येथील व्यापारी अमोल अशोक कोकाटे यांच्याविरुद्ध सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्याभरात चिपळूण मध्ये तब्बल 26 लाखांचा गुटख्याचा साठा आढळून आला होता. यामुळे आता राज्यात गुटखा बंदी असताना देखील गुटख्याची साठवणूक आणि विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पुढे येत आहे .शहर व जिल्ह्यातील टपऱ्यांवर गुटका सांकेतिक भाषा वापरून विकला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या शिवाय शेजारच्या राज्यातून गुटख्याची अनधिकृत वाहतूक सुरू असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये कर्नाटक कनेक्शन असून चिपळूण पोलिसांनी मध्यंतरी या प्रकरणात काहीना अटक केली होती तरीही गुटखा विक्री व साठा थांबलेली नाही हे स्पष्ट होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या