‘मास्क’की पाठशाळा सुरू! थर्मल स्क्रिनिंग,ऑक्सिजनची तपासणी करत विद्यार्थ्यांना प्रवेश

कोरोनाच्या काळात बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू झाल्या. इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग आज भरले. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला असून विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजनची तपासणी करून शाळेत प्रवेश देण्यात आला.

राज्यातील 9 वी ते 12वीचे वर्ग आजपासून सुरू झाले. वर्ग सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली.तसेच शाळेतील वर्गखोल्या सॅनिटाईज करण्यात आल्या.आज सोशल डिस्टन्सिंग ठेऊन वर्ग सुरू करण्यात आले.

आज इंग्रजी,गणित आणि विज्ञानच्या तासिका घेण्यात आला. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळेत आले नसले तरी हळूहळू उपस्थितीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी शहर आणि परिसरातील शाळांना भेटी देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही याबाबत पाहणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या