अण्णा नाईक परत येणार, झी मराठी कडून रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्य़ा सीजनची घोषणा

होय अण्णा नाईक परत येणार असून रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा भाग येणार आहे. झी मराठीने एक टीझर लॉन्च केला असून रात्रीस खेळ चाले 3 येणार असे म्हटले आहे.


झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले मालिका ही प्रेक्षकांना खूप आवडली होती, त्यापैकी शेवंता आणि अण्णा नाईक या व्यक्तीरेखा घराघरात पोहोचल्या होत्या. आतापर्यंत रात्रीस खेळ चालेचे दोन भाग आले होते. दोन्ही भागांची सुरूवात आणि शेवट अण्णा नाईकांच्या मृत्यूने होते. आता रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीजन म्हणजेच तिसरा भाग येत आहे.

आता झी मराठीने नवीन टीझर लॉन्च करून रात्रीस खेळ चालेचा तिसरा भाग येत असल्याचे जाहीर केले आहे. प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून आगामी मालिकेत अण्णा नाईकांच्या आयुष्याचा कुठला भाग दाखवण्यात येणार आहे, त्यात शेवंता असणार आहे का असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या