रवी शास्त्री यांच्या निवडीवर क्रिकेट चाहते नाराज, केली काँग्रेससोबत तुलना

1536
ravi-shastri-bcci

क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांना पुन्हा एकदा हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून निवडलं आहे. 2021मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापर्यंत शास्त्री प्रशिक्षकपदी राहणार आहेत. पण, शास्त्री यांची निवड अनेक क्रिकेट चाहत्यांना रुचलेली नाही. त्यामुळे त्यांनी रवी शास्त्री यांना ट्रोल करत या घटनेची तुलना काँग्रेसशी केली आहे.

रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा निवड करणं म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सोनिया गांधींची निवड केल्यासारखी आहे, अशा शब्दांत चाहत्यांनी शास्त्रींवर टीकास्त्र सोडलं आहे. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे टीम इंडियाने आता 2023चा विश्वचषक हरण्यासाठी तयार राहणं, गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. रवी शास्त्री हे वजन वाढवतील आणि कोहली त्याची शतकं, हिंदुस्थानच्या खात्यात चषक वाढतात की नाही, त्याबद्दल कुणालाही काही पडलेलं नाही, असं म्हणत एका नेटकऱ्याने रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे.

अनेकांनी शास्त्री यांच्या टीकेवर परखडपणे नापसंती दर्शवली आहे. क्रिकेट सल्लागार समितीच्या म्हणण्यानुसार, माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत आणि राबिन सिंगसुद्धा प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. पण, त्यांच्या तुलनेत शास्त्री यांची कामगिरी उत्तम असल्याने त्यांची निवड केली आहे, असं समितीने स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या