
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी आणि गुजरातची शिक्षणमंत्री रिवाबा जडेजा ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रिवाबा जडेजा हिने एका जाहीर कार्यक्रमामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंवर गंभीर आरोप केले. टीम इंडियाचे खेळाडू परदेशात जाऊन व्यसन करतात असा आरोप तिने केला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रीडा जगतामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जामनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रिवाबा जडेजा हिने पती रवींद्र जडेजाचे तोंडभरून कौतुक केले. माझ्या पतीला (रवींद्र जडेजा, क्रिकेटपटू) लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशांमध्ये खेळण्यासाठी जावे लागते. पण त्यांनी आजवर कोणतेही व्यसन केले नाही. पण टीममधील इतर खेळाडू परदेशात जाऊन चुकीचे काम करतात, असे रिवाबा जडेजा म्हणाली.
माझ्या पतीलाही या सर्व गोष्टी करता आल्या असत्या, त्यासाठी त्याला रोखणारेही कुणी नव्हते. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे, असेही रिवाबा जडेजा म्हणाली. रिवाबाचा महिन्याभरापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या व्हिडीओवर रिवाबा किंवा जडेजाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
“मेरे पति (रवींद्र जडेजा , क्रिकेटर)को लंदन , दुबई, ऑस्ट्रेलिया जैसे अनेकों देशों में खेलने के लिए जाना होता है फिर भी आज दिन तक उन्होंने कभी व्यसन नहीं किया क्योंकि वो अपनी जवाबदारी को समझते हैं @Rivaba4BJP जी , शिक्षा मंत्री गुजरात सरकार #Rivabajadeja #ravindrajadeja pic.twitter.com/OyuiPFPvVa
— राणसिंह राजपुरोहित (@ransinghBJP) December 10, 2025
जडेजा सीएसकेकडून राजस्थानकडे
दरम्यान, आयपीएलच्या आगामी हंगामामध्ये रवींद्र जडेजा गुलाबी जर्सीत खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजाबाबत करार झाला. त्या करारानुसार राजस्थानने संजूला सीएसकेला दिले, तर त्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थानकडे परतला आहे.
IPL 2025 – जडेजाची ‘घरवापसी’, तर संजूने घातली पिवळी जर्सी; रात्रीतून 10 खेळाडूंची अदलाबदल

























































