नोंद – आठवणीची आठवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

काही काही आठवणींचं वेगळंच असतं. एकाला एक धरून त्या येतात. रघुकुलच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला गेलो तेव्हा असंच काहीसं झालं. त्यालाही बरीच वर्षे झाली. अपरात्री घरी परतत होतो आणि बरोबरचा मित्र एकदम ओरडला, “बापरे, वाट लागली.”
दचकून मी म्हटलं, “काय झालं एव
“अरे, उद्या गुना? बाबांनी पंचांग आणायला सांगितलं होतं. नव्या वर्षाला आमच्याकडे त्याची पूजा होते. आता एवढ्या रात्री पंचांग कुठे मिळणार? उद्या सकाळी सकाळी आता माझी हजामत.” मित्राच्या आवाजातील काळजी आणि भीती कळत होती.
मीदेखील काळजीत पडलो. एखादा कुळाचार करायचा राहिला तर कशी रुखरुख लागते हे मला माहीत आहे. पण एकदम मला आठवलं. मी त्याला म्हटलं, “काळजी नको करूस. माझ्याकडे आहे पंचांग. ते तू घेऊन जा.”
तेव्हा तो म्हणाला, “तुला पण पंचांग लागेल ना?”
त्याची काळजी खरी होती. तरी मी त्याला म्हणालो, “त्याची नकोस तू काळजी करू.”
एवम्हणून डोंबिवलीला उतरता उतरता मी माझ्या शबनम बॅगेतून त्याला पंचांग कादिलं.
“सुटलो. थँक्स. पंचांग उद्या दिसलं नसतं तर माझं काही खरं नव्हतं.” त्या काळोखातदेखील त्याचा चेहरा केवउजळलेला दिसत होता. दोन दिवसांनी मित्राकडे गेलो. म्हटलं, “झाली का पूजा वगैरे.”
“तर. तू दिलेल्या पंचांगामुळे सगळं यथासांग झालं. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.” मित्राच्या डोळ्यांत कृतज्ञ भाव दिसत होता.
मग माझ्या झोळीतून पंचांग कात्याला देत म्हटलं, “मी दिलेलं ते पंचांग दे आणि आता हे पंचांग तिथे ठेव.”
मित्र म्हणाला, “अरे मी येणारच होतो तुझ्या घरी.”
एवय़ात मित्राचे वडील आपल्या खोलीतून बाहेर येत म्हणाले, “अच्छा, तुम्ही पंचांग आणून दिलं होतं तर.”
काही बोललो नाही. मित्राने दिलेलं पंचांग झोळीत टाकलं आणि मित्राला म्हटलं, “चल जरा बाहेर जाऊन येऊ.”
बाहेर पडल्यानंतर मित्राला म्हटलं, “तू सुटलास आणि मी पण सुटलो.”
“म्हणजे काय?”
झोळीतलं पंचांग कात्याला म्हटलं, “हे बघ.”
“आता पंचांगात ते काय पाहायचं? पंचांगासारखं पंचांग!”
मी म्हटलं, “जरा वाचायचे कष्ट तरी घेशील ना?”
मित्राने बळेबळे ते बघितले आणि आश्चर्यचकित होऊन तो म्हणाला, “ग्रेट, मानलं तुला!” एवम्हणून तो माझे पाय धरू लागला.
झालं असं होतं की, मी मित्राला आधी दिलेलं पंचांग नव्हतंच. हुबेहुब, डीट्टो पंचांगासारखा दिसणारा कवितासंग्रह होता! ही सगळी जादू होती रघुकुल याच्या ‘तेरावा महिना 2’ या कवितासंग्रहाची! 1977 साली या संग्रहाची प्रथम आवृत्ती जे जे स्कूल ऑफ आर्टसमधल्या मित्रमंडळीतच हातोहात संपली होती. पण त्याचा हवा तसा गाजावाजा झाला नव्हता. त्यानंतर तब्बल 40 वर्षांनंतर परममित्र पब्लिकेशन्सतर्फे त्याची दुसरी आवृत्ती निघाली. तेव्हा रघुकुल मला म्हणाला, “अरे, याचं काही तरी कर ना.”
अर्थात काहीतरी वेगळं असणाऱया गोष्टींचं मी नेहमीच स्वागत करत आलो आहे. त्याप्रमाणे रघुकुलच्या कवितासंग्रहाची यथासांग दखल घेतली होती. पुत्याच्या कवितासंग्रहाची गुयाला पूजा कशी झाली हेदेखील सांगून आम्ही दोघे भरपूर हसलो होतो.
तेव्हापासून रघुकुलच्या एकांकिका, नाटक सिनेमाबद्दल, त्याच्या लेखाबद्दल बरेच बोलणं होई. त्याच्या ‘लोलक’ व्यक्तिचित्र पुस्तकाचं तर प्रकाशन माझ्या हस्ते झालं होतं!
त्याच्या निमित्ताने आठवणी व्हायच्याच, पण गुयाला ‘तेरावा महिना’ या कवितासंग्रहाच्या गमतीची आठवण झाली नाही असं कधी झालं नाही. कालच्या गुयालादेखील ही आठवण जागवली मात्र त्याला दुःखाची किनार होती. कारण त्याआधीच 5 मार्चला त्याचे दुःखद निधन झाले होते. पुरुषोत्तम बेर्डेने त्यानिमित्ताने श्रद्धांजली सभा घेतली. अनेकांनी रघुकुलच्या आठवणी जागवल्या. त्या इतक्या होत्या की, शेवटी वेळ पुरला नाही. त्यामुळे मी बोलायचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच आता रघुकुलच्या आठवणीची नोंद.