रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. रविवारी त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली.

शक्तीकांत दास यांनी ट्विट करून सांगितलं की, ‘कोणतीही लक्षण नसताना माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी हे सूचित करु इच्छितो. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी रिझर्व्ह बँकेचं कामकाज हे नेहमीप्रमाणं सुरु राहणार आहे. सर्व उपगव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांसाठी मी व्हिडिओ कॉन्फरन्स आणि फोनवरुन सर्व दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे.’, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, देशात सलग तिसर्‍या दिवशी 24 तासांत कोरोना विषाणूचे प्रकरण 55 हजारांपेक्षा कमी झाले आहे, तर जवळपास तीन महिन्यांनंतर एका दिवसात मृत्यूची संख्या 578 वर आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या