
हिंदुस्थानी बँकिंग सेक्टरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी विदेशी डील होणार आहे. संयुक्त अरब अमितार (यूएई) ची सर्वात मोठी बँक एमिरेट्स एनबीडी आरबीएल बँकेत जवळपास 3 अब्ज डॉलर म्हणजेच 26 हजार 850 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 60 टक्के भागीदारी खरेदी करणार आहे. एमिरेट्स एनबीडी या डीलअंतर्गत 280 रुपये प्रति शेअर भावाने आरबीएल बँकेचे शेअर खरेदी करणार आहे. हा व्यवहार देशातील बँकिंग क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणुकीपैकी एक मानला जात आहे. हा व्यवहार आरबीआय, शेअरधारक आणि अन्य संस्थांच्या मंजुरीवर अवलंबून आहे.