आमचा सुपर स्टार.

>>विजय पाटकर. (ज्येष्ठ अभिनेते)

 ‘प्रदीप पटवर्धन’ हा आमच्या काळातला सुपरस्टार. त्यांच्या निधनाने आमच्या काळातला सुपरस्टार गेला. महाविद्यालयात असल्यापासून मी त्याचं काम बघितलं आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तो स्टार होता. त्याच्या अभिनयाची रसिक प्रेक्षकांवर छाप पाडायचा. एक चांगला अभिनेता आणि माझा चांगला मित्र गेला. त्याच्या बरोबर दिग्दर्शक आणि अँकर म्हणून ब-याच ठिकाणी काम केलं आहे. तो महाविद्यालयापासून माझा चांगला मित्र होता. ब-याचशा नाटक आणि मालिकांमधून आम्ही एकत्र काम केलंय. कॉमेडी शोमध्येही एकत्र काम केलंय. आम्ही भेटल्यावर खूप मज्जा करायचो. थट्टा- मस्करी, भंकस त्याला खूप आवडायची.