पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचे वास्तव १ मे रोजी देशाला कळेल, काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनिष तिवारी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत म्हटले आहे की, १ मे २०२६ रोजी इंधनाच्या किमतींचे खरे वास्तव देशासमोर येईल.

लोकसभेत बोलताना मनिष तिवारी म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर स्थिर ठेवले गेले असावेत. मात्र १ मे पासून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. “सरकार सध्या जाणीवपूर्वक किमतींवर नियंत्रण ठेवत आहे, पण ही परिस्थिती १ मे नंतर बदलणार असून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते,” असे तिवारी म्हणाले.

काँग्रेस खासदारांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारे बदल आणि देशांतर्गत विक्री किंमत यामध्ये मोठी तफावत आहे. सरकार केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. १ मे रोजी जेव्हा नवीन दर समोर येईल, तेव्हा जनतेला इंधन दरवाढीचा खरा धक्का बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.