चमचमीत असा डाळ तडका

साहित्य -1 वाटी तुरीची डाळ, थोडे पाणी, फरसबीच्या दहा ते बारा शेंगा किंवा तोंडली, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा काळीमिरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा मीठ, 3 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्ध्या लिंबाचा रस.

कृती – डाळ शिजत ठेवताना त्यात चिमूटभर हिंग, 2 चिमटी हळद, पाव चमचा तेल, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या व फरसबीच्या शेंगाचे तुकडे घालावेत. वांगी किंवा तोंडली असल्यास देठ काढून टाकून मध्यम तुकडे करावेत. भाजी डाळीत पूर्ण शिजवावी. तव्यावर, छोटय़ा कढईत किंवा पातेलीत पाव चमचा तेलावर जिरे व मिरे बदामी रंग येईपर्यंत परतावे.
व त्याची पूड करावी. शिजलेल्या डाळीत ही पूड व मीठ घालावे. तेलाची फोडणी करून (मोहरी, हिंग, हळद) डाळीवर ओतावी व डाळ खाली उतरावी. गरमागरम वाढावी.