वाचा चमचमीत काकोरी कबाबची रेसिपी

साहित्य-मटणाचा खिमा पाव किलो, तळलेल्या कांद्याची पेस्ट अर्धी वाटी, घट्ट दही अर्धी वाटी, पपईची पेस्ट अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी, वाळलेली गुलाबाची पाने 8-10, गुलाबजल 1 चमचा, तिखट चवीनुसार, लवंग पूड अर्धा चमचा, वेलची पूड अर्धा चमचा, केशर चिमूटभर, धणे-जीरे पावडर 1-1 चमचा, काजू पेस्ट अर्धी वाटी.

कृती – दही, पपई, खिमा व कांद्याची पेस्ट एकत्र करुन 7-8 तास ठेवा. त्यानंतर त्यात तळलेल्या कांद्याची पेस्ट बेसन व इतर मसाले टाकून छान मळून घ्या. सळईला लावून मंद आचेवर शेका.