चटक मटक : फ्रुट पंच

9

फ्रुट पंच

साहित्य : 4 कप थंड पाणी, अर्धा किलो साखर, 2 कप संत्र्याचा रस, 1 कप लिंबाचा रस, 2 कप अननसाचा रस.

कृती : फ्रुट पंच बनवताना सर्वप्रथम साखरेत पाणी घालून 10 मिनिटे उकळवावे. नंतर गार झाल्यावर सर्व रस त्यात ओतून फ्रीजमध्ये अगदी थंडगार करावा. आयत्या वेळी त्यात अगदी थंडगार पाणी घालून सर्व्ह करावे.