गोकुळाष्टमी स्पेशल : कृष्णाला दाखवा ‘हा’ नैवेद्य

सामना ऑनलाईन । मुंबई

धण्याची पंजीरी खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक असते. ही धण्याची पंजीरी खास गोकुळ जन्माष्टमी दिवशी बनवली जाते. कृष्णाला नैवेद्य दाखवून या पंजिरीद्वारे गोकुळ जन्माष्टमीचा उपवास सोडला जातो. परंतू तुम्ही ही धण्याची पंजिरी कधीही बनवू शकतात. त्याची साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे :

साहित्य :
धण्याची पावडर
साजूक तूप
पिठीसाखर
खोबऱ्याचा खिस
मखाना
काजू
बदाम
चारोळे – एक चमचा

कृती :
धण्याची पंजिरी बनवण्यासाठी एका कढईमध्ये १ टेबल स्पून साजूक तूप घाला. तूप गरम झाल्यास त्यामध्ये धण्याची पुड टाकून चांगले एकजीव करून परतून घ्या. आता त्यामध्ये मखान्याचे ४-४ तुकडे करा. एका पॅनमध्ये तेल टाकून ते मखाने परतून घ्या. आता या परतलेल्या मखान्याला लाटण्याच्या साहाय्याने बारीक करून घ्या. भाजलेले धण्याची पावडर, बारीक केलेले मखाने, किसलेला नारळ, पिठीसाखर आणि बारिक केलेले काजू, बदाम, चारोळे टाकून पंजिरी तयार करा. तयार आहे तुमची धण्याची पंजिरी .