‘सुशीला’ तुम्ही कधी खाल्ला आहे का?

44

सामना ऑनलाईन । मुंबई

आपण रोज नाश्ता करताना पोहे, उपमा, शिरा यासारखे पदार्थ बनवत असतो. पण कधी तुम्ही ‘सुशीला’ बनवला आहे का? अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीचा हा सुशीला तुमच्या कुटुंबीयांना नक्की आवडेल. एकदा हा पदार्थ तुम्ही नक्की करून पाहा.

साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे ;

– साहित्य :-
चुरमूरे (मुरमूरे) – अर्धा किलो
शेंगदाणे – 1 छोटी वाटी
फुटाणे पीठ – 1 वाटी
हिरवी मिरची – 5
जिरे, मोहरी- चिमुठभर
हळद – चिमुठभर
मीठ – चवीनुसार
कांदा – 1 बारीक चिरून
कोथिंबीर- सजावटीसाठी

– कृती :-

प्रथम एका बाउलमध्ये चुरमूरे (मुरमूरे) २-३ मिनिटे पाण्यात भिजवावे. नंतर भिजवलेल्या चुरमूरे पिळून पाणी काढून टाका. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी टाकून तडका येऊ द्या. तडका आल्यानंतर त्यात चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. त्यानंतर त्यात मिरच्या आणि शेंगदाणे टाकून चांगले परतून घ्या. त्यात हळद टाकून भिजवलेले चुरमूरे टाकून चांगले एकजीव करून घ्या. त्यात मीठ घालून पुन्हा हलवून एकत्र करा. त्याला एक वाफ येवू द्या. वाफ आल्यावर कोथिंबीर टाकून सजवून घ्या. तयार आहे तुमचा सोपा आणि चविष्ठ सुशीला.

आपली प्रतिक्रिया द्या