रिझर्व्ह बँकेत ऑफिस अटेंडंड भरती

रिझर्व्ह बँकेत ‘ऑफिस अटेंडंट ’ या पदाकरिता नोकरभरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन rbi.org.in या संकेतस्थळावर 25 मार्च 2021 पूर्वी अर्ज करावयाचा आहे. उमेदवाराचे वय सर्वसाधारण वर्गासाठी 18 ते 25 वर्षे असावे, तसेच आरक्षित प्रवर्गांसाठी शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्यादेत शिथिलता असेल. एकूण पदांची संख्या 841 असून पे स्केल रु. 10,940/- ते 23,700/- मासिक अधिक अन्य भत्ते असेल. जे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असतील त्यांनी या पदासाठी अर्ज करावा. ओबीसी ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी रु. 450/-एससी, एसटी, दिव्यांग व माजी सैनिकांसाठी रु. 50/-आहे. या पदासाठी 9 आणि 10 एप्रिल 2021 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.

नोकरभरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, महासंघ कार्याध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, महासंघ सरचिटणीस, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या पदाच्या नोकरभरती पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण वर्ग होणार आहेत. अधिक माहितीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, दुसरा मजला येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सायं. 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के मो.(9892699215), श्रीराम विश्वासराव मो. (9869588469), विलास जाधव मो. (9619118999) यांच्याशी संपर्क करावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या