48 मेगापिक्सल असलेला Redmi Note 10T 5G हिंदुस्थानात लॉन्च, किंमत आहे…

Redmi चा नुकताच Redmi Note 10T 5G हा फोन लॉन्च झाला आहे. या फोन बजेट फोन असून त्याचा रॅम 6 GB इतका आहे. तर कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असून त्याचे फीचर Samsung Galaxy M32 सारखेच आहे.

Redmi Note 10T 5G या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 11 आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 700 प्रोसेसरही देण्यात आला आहे. 

या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सलचा मायक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगासाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.  

Redmi Note 10T 5G मध्ये दोन प्रकार आहेत. त्यात 4GB RAM आणि 64GB इंटर्नल मेमरी असलेल्या फोनची किंमत 13 हजार 999 इतकी आही. तर 6GB RAM आणि 128 GB मेमरी असलेल्या फोनची किंमत 15 हजार 999 इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या