
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो अॅपवर आता ग्राहक केवळ त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर असलेल्या स्मार्ट फोनमधूनच लॉगइन करू शकणार आहेत. या नियमानुसार तुम्ही अन्य कोणत्याही मोबाईलमध्ये योनोद्वारे लॉगइन करू शकणार नाही. ऑनलाइन बँकिंग फ्रॉड टाळण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. यामुळे ग्राहकांचे व्यवहार आधीपेक्षा जास्त सुरक्षित होणार आहेत. दरम्यान, ग्राहकांनी नवीन रजिस्ट्रेशनसाठी ज्या स्मार्ट फोनमध्ये एसबीआय अकाऊंटला जोडलेला मोबाईल नंबर असेल त्याच स्मार्टपह्नचा वापर करावा, अशी सूचना एसबीआयने ग्राहकांना केली आहे.




























































