पोलिसांच्या हाती धागेदोरे; बोठेच्या अडचणी वाढल्या

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांमध्ये पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, बोठे याच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बोठे याने संभाजीनगर खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली आहे. 18 जानेवारीला झालेल्या प्राथमिक सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता पोलीस खंडपीठात काय भूमिका मांडतात, यावर बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय अवलंबून आहे. येत्या 28 रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी खंडपीठात होणार आहे.

जरे यांची हत्या होऊन दीड महिना उलटूनही बोठे पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंटही मिळवले आहे. आता त्याला फरार घोषित करण्याची न्यायालयीन प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. बोठे याच्या वतीने ऍड. संतोष जाधवर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या