कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई व सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावणी’ या अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय जाधव आहेत. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, दिनकर गांगल, डॉ. मनोहर जाधव व डॉ. प्रज्ञा दया पवार हे प्रमुख वत्ते असतील. हा कार्यक्रम शनिवार 15 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता सम्राट अशोका हॉल, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, चार बंगला, लोखंडवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे होईल. या कार्यक्रमाला ‘छावणी’चे संपादक डॉ. महेंद्र भवरे, डॉ. सुनील अवचार, किशोर मेढे व सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे नितीन कोतापल्ले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पेंद्राचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी केले आहे.