रिलायन्स जिओचा बडा धमाका, ‘THE NEW JIOPHONE 2021 OFFER’ ची केली घोषणा

मोबाईल नेटवर्क कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालणार असल्याचे दिसत आहे. उद्योजक मुकेश अंबानी याच्या मालकीच्या जिओ कंपनीने आता ‘THE NEW JIOPHONE 2021 OFFER’ ची घोषणा केली आहे. कंपनीने एक प्रेस रीलिजद्वारे या खास ऑफरची माहिती दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, THE NEW JIOPHONE 2021 OFFER चा फायदा देशभरातील ग्राहक 1 मार्चपासून घेऊ शकतील. ही ऑफर देशभरातील रिलायन्स रिटेल आणि जिओ रिटेलर्स यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. देशाला ‘2G मुक्त’ बनवण्यासाठी ही खास ऑफर आणली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. देशभरात जवळपास 10 कोटी जिओ युजर्स असून या नवीन ऑफरचा फायदा कोट्यवधींना ग्राहकांना होणार आहे. या खास ऑफरबाबत अधिक जाणून घेऊया…

नवीन ग्राहकांसाठी ऑफर

– नवीन ग्राहकांना 1999 रुपयांमध्ये जिओफोन डिव्हाईससोबत 24 महिन्यांसाठी (2 वर्ष) अनलिमेटेड सेवा मिळणार आहे. यात अनलिमिटेड व्हाईस कॉल, अनलिमिटेड डेटा (2 जीबी हायस्पीड डेटा) मिळणार आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना 2 वर्ष रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

– 1499 रुपयांमध्ये जिओफोन डिव्हाईस आणि 12 महिन्यांसाठी अनलिमिटेड सेवा मिळेल. यात ग्राहकांना अनलिमिटेड व्हाईस कॉल, अनलिमिटेड डेटा (2 जीबी हायस्पीड डेटा) मिळणार आहे.

749 रुपयांत वर्षभर सेवा

दरमयान, जिओफोन युजर्ससाठीही कंपनीने एक नवीन ऑफर आणली आहे. 749 रुपयांच्या या खास ऑफरमध्ये युजरला एक वर्ष अनलिमिटेड सेवेचा लाभ घेता येणार आहे. यात अनलिमिटेड व्हाईस कॉल, अनलिमिटेड डेटा (2 जीबी हायस्पीड डेटा) ग्राहकांना मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या