रिलायन्सने रचला इतिहास, बाजार भांडवल गेले 9 लाख कोटींवर!

ख्यातनाम उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने उद्योग क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. कंपनीचे बाजार भांडवल शुक्रवारी तब्बल 9 लाख कोटींवर पोहचले. हा पल्ला गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही हिंदुस्थानातील पहिली कंपनी ठरली आहे.

शेअर बाजारात शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी 2.28 टक्क्यांची उसळी घेत 1428 रुपयांचा रेकॉर्ड नोंदवला. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल 9 लाख कोटींवर गेले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 8 लाख कोटींच्या बाजार भांडवलचा पल्ला गाठला होता. रिलायन्सपाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या बाजार भांडवलने 8 लाख कोटींवर मजल मारली.

रिलायन्सला जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत तब्बल 11262 कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे तर जिओला 990 कोटींचा फायदा झाला आहे.

टॉप फाइव्ह कंपन्या     (बाजार भांडवल कोटींमध्ये)
रिलायन्स इंडस्ट्रीज       9,01,490.09
टीसीएस                  7,71,996.87
एचडीएफसी बँक        6,72,466.30
हिंदुस्थान युनिलिव्हर     4,55,952.72
एचडीएफसी              3,61,801.97

आपली प्रतिक्रिया द्या