प्रवेशाची संधी हुकलेल्यांना नामांकित कॉलेजची लॉटरी

320

अकरावीच्या तीन मुख्य गुणवत्ता याद्यांनंतरही प्रवेशाची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत नामांकित कॉलेजची लॉटरी लागली आहे. दहावीत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळूनही काही विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळाला नव्हता, पण बुधवारी जाहीर झालेल्या विशेष फेरीत गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे विशेष फेरीच्या कटऑफवरून दिसून आले.

विशेष फेरीतील रुईयाचा आर्टस्चा कटऑफ 92.20 टक्के तर सायन्सचा कटऑफ 94.80 टक्क्यांवर पोहचला. वझे-केळकर कॉलेजच्या सायन्सच्या कटऑफने उच्चांक गाठून 98.20 टक्क्यांवर झेप घेतली. या कॉलेजमध्ये सायन्स शाखेची एकच जागा शिल्लक होती. त्यामुळे या जागेवर 98.20 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले. झेवियर्स कॉलेजची आर्टस्ची कटऑफ 95.20 टक्क्यांवर क्लोज झाली तर एन. एम. कॉलेजच्या कॉमर्सच्या कटऑफमध्येही वाढ होऊन तो 96.20 टक्क्यांवर पोहचल्याचे पाहायला मिळाले. आधीच्या प्रवेश फेरीत पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेल्या, आतापर्यंत प्रवेश फेरीत सहभागी न झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे कटऑफचा टक्का चढा असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले.

काही कॉलेजचे कटऑफ
सायन्स – रुपारेल – 93.20, साठय़े -v 74.60, भवन्स, अंधेरी – 78, सीएचएम – 82, झेवियर्स – 88.20, बिर्ला – 87.80, बांदोडकर – 93, सोमय्या – 74.20
कॉमर्स- एचआर- 83, केसी – 81.40, जयहिंद- 83.20, रुपारेल- 91.20, साठय़े – 85.60, डहाणूकर- 87.80, भवन्स, अंधेरी- 86, मिठीबाई – 87.60, एनएम – 96.20, मुलुंड – 92, बिर्ला- 87, सोमय्या- 82.60.

आर्टस् – केसी 74.40, जयहिंद 83.20, रुपारेल 87.60, साठय़े 51, भवन्स, अंधेरी 56.80, मिठीबाई 85.40, वझे केळकर 89.20, बिर्ला 58.20.

सायन्सचा कटऑफ 39 टक्क्यांवर

आर्टस्, कॉमर्सच्या तुलनेत यंदा सायन्स शाखेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दक्षिण मुंबईतील नामांकित कॉलेजच्या सायन्सचा कटऑफ आर्टस् आणि कॉमर्स शाखेपेक्षा खूपच खालावला. केसी कॉलेजच्या सायन्सचा कटऑफ 48 तर जयहिंद कॉलेजचा कटऑफ 39.20 टक्के झाला. मिठीबाई कॉलेजचा सायन्सच्या कटऑफमध्ये कमालीची घट होऊन कटऑफ 67.83 टक्के झाला.

– इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि आतापर्यंतच्या ऑनलाइन प्रवेश फेऱयांमधून (दुसऱया यादीपर्यंत) 1 लाख 55 हजार 328 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
– विशेष फेरीत कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी 16 व 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
– प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळापत्रक लवकरच अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर जाहीर होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या