
उन्हाळ्यात अनेकांना त्वचेचे आजार होतात. त्यात ओठांभोवतीचा भाग काळपट होण्याची समस्या बहुतांश जणांना त्रस्त करते. तीव्र ऊन, घाम, धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे ही समस्या वाढते.
या समस्येवर चंदन पावडरमध्ये गुलाब जल मिसळून तयार केलेली पेस्ट ओठांच्या भोवती लावल्यास दिलासा मिळू शकतो.
ओठांभोवती तूप लावल्यास फायदा होतो. तुपामुळे त्वचेला पोषण मिळते, कोरडेपणा कमी होतो. त्वचेवर काकडीचा रसदेखील उपयुक्त ठरू शकतो. दही आणि मधाचे मिश्रणदेखील प्रभावी ठरते.
























































