‘या’ कारच्या खरेदीवर मिळतेय 2.5 लाखांची ऑफर…जाणून घ्या फिचर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2021 या वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. नाताळाच्या निमित्ताने अनेक कार विक्रेत्या कंपन्यांनी ग्राहकांना विविध ऑफर दिल्या आहे. एका कारच्या खरेदीवर या महिन्यात तब्बल अडीच लाखांची ऑफर देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात Renault Duster कारने ग्राहकांसाठी विशेष ऑफर दिली आहे. या महिन्यात ही कार खरेदी करत ग्राहक अडीच लाखांची बचत करू शकतात. त्याचप्रमाणे डस्टरच्या काही मॉडेलवर 2.50 लाखांपर्यंतचे बेनिफिट देण्यात येत आहेत.

31 डिसेंबर 2021 पर्यंत कारची नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना 1.30 बेनिफेट देण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले. त्यात 50 हजारापर्यंत एक्सचेंज ऑफर, 50 हजार रुपयांपर्यंत कॅश बॅक डिस्काउंट आणि 30 हजार रुपयांपर्यंतच्या कार्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रेनॉ डस्टरवर 1.10 लाखापंर्यतचा स्पेशल लॉयल्टी बेनफिट्सही मिळत आहेत. स्क्रॅपेज प्रोग्रॅमतंर्गत 10 हजार रुपयांचा फायदाही मिळणार आहे. या प्रमाणे ही कार या महिन्यात खरेदी केल्यास 2.50 लाखांचा फायदा मिळणार आहे.

कॉम्पैक्ट एसयूवी Renault Duster ची किंमत 9.86 लाख आहे. ही 5 सिटर कार आहे.यात दोन इंजिनचे पर्याय आहेत. एक इंजिन 1.5 लिटर पेट्रोल युनिट (106PS / 142Nm) आहे. त्यात 5 स्पीड MT आहे. तर दुसरे इंजिन 1.3 लिटर टर्बो-पेट्रोल यूनिट (156PS / 254Nm) आहे. त्याला 6 स्पीड MT आणि 7 स्टेप CVT ने जोडण्यात आले आहे.

या कारमध्ये अंड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसोबत 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 6 स्पीकर Arkamys साउंड सिस्टम आणि रियर एसी वेंट्ससोबत ऑटो क्लायमेट कंट्रोलही आहे. डीआरएलसोबत प्रोजक्टर हेडलँप, इंजिन आयडल स्टॉप/ स्टार्ट आणि केबिन प्री कूलिंगची सुविधा देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी यात ड्यूल फ्रंट एअरबॅग, EBD सोबत एबीएस, रियर पार्किंग सेंसर आणि फ्रंट सिटबेल्ट रिमांयजर सारखे अनेक फिचर आहेत.

या कारचा मुकाबला Hyundai Creta, Nissan Terrano, Tata Harrier आणि MG Hector सारख्या कारशी आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 2.5 लाखांची विशेष ऑफर ग्राहकांना दिली आहे. त्यामुळे या महिन्यात ही कार बुक केल्यास 2.5 लाखांचा फायदा ग्राहकांना होणार आहे.