रत्नागिरीत तयार झाली आयएनएस ओल्ड विक्रांत जहाजाची प्रतिकृती

मिरजोळे पाटीलवाडी येथे दी मॉडेल क्राफ्टच्या टीमने अवघ्या 22 दिवसांत 35 फूट आकाराच्या ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ जहाजाची प्रतिकृती तयार केली आहे. दिल्ली रक्षा मंत्रालयाच्या कोलकाता येथील पी. एम. संग्रहालयाचे हि प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे.

मयूर वाडेकर व त्याच्या 14 जणांच्या समूहाने ही जहाजाची प्रतिकृती तयार केली आहे. मयूर हा 2013 सालचा नेव्हल एनसीसी छात्र असून, त्याने सन 2019 ते 2021 या कालावधीत शीप मॉडेलिंगचे प्रशिक्षण कोचिन येथे पूर्ण केले. त्यानंतर 2017 पासून तो शीप मॉडेलिंग करत आहे. मयूर याच्या दी मॉडेल क्राफ्ट्स ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ जहाजाची प्रतिकृती अवघ्या एक महिन्यात तयार करण्याची ऑर्डर मिळाली. वूड प्लस जीआरपीमध्ये ही प्रतिकृती तयार करायची असल्याने त्यांच्यासमोर एक आव्हान होते. मात्र गेले 22 दिवस-रात्र अखंड परिश्रम घेत मयूर वाडेकर व त्याच्या सहकाऱ्यांनी 35 फूट आकार व तीन टनापेक्षा जास्त वजनाच्या जहाजाची प्रतिकृती तयार करण्यात यश आले आहे.