रविवारी प्रजासत्ताक दिनी शाळेत झेंडावंदन, विद्यार्थी संचलनही होणार

1097

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा होणार असून यादिवशी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहून झेंडावंदन, संचलन तसेच राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायचे आहेत.
महापालिका शिक्षण विभागाने वर्ष 2020 साठी वार्षिक अंतरिम सुट्टय़ांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्यदिनी शाळेत झेंडावंदन, संचलन तसेस राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडायचे आहेत. त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रजासत्ताक दिन रविवारी तर स्वातंत्र्यदिन शनिवारी साजरा होणार आहे. यादिवशी शाळांना सुट्टी असते, मात्र यंदा यादिवशीही शाळेत हजर राहावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रप्रेम, देशाभिमानाच्या भावना रूजविण्यासाठी झेंडावंदन, संचलन व इतर राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे आदेश महापालिका शिक्षण विभागाने राज्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसारच जारी केले आहेत- महेश पालकर, शिक्षणाधिकारी मुंबई महापालिका

आपली प्रतिक्रिया द्या