सगळीकडे फक्त ‘दूरदर्शन’ची चर्चा! वाचा काय आहे कारण…

1947

हिंदुस्थानचा 71वा प्रजासत्ताक दिन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. दरवर्षी या सोहळ्याचं एक मुख्य आकर्षण असतं, ते म्हणजे राजपथावर होणारा संचलन सोहळा. हिंदुस्थानची सैन्य शक्ती, शस्त्रास्त्रांचं सामर्थ्य तसंच विविध राज्यांच्या संस्कृतींची प्रतीकं असलेले चित्ररथ असा हा देखणा सोहळा तमाम हिंदुस्थानी अगदी न चुकता पाहतात.

ज्यांना या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष हजर राहणं शक्य नसतं असे बहुतांश हिंदुस्थानी नागरिक टीव्हीवर हा सोहळा पाहतात. एरवी आपापल्या पसंतीचे चॅनल पाहणाऱ्या हिंदुस्थानी घरांमध्ये या दिवशी टीव्हीवर फक्त दूरदर्शन ही एकच वाहिनी सुरू असते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनादिवशीही काही वेगळं चित्र पाहायला मिळालं नाही. पण, यामुळे दूरदर्शन ही वाहिनी मात्र चांगलीच चर्चेत आली आहे.

याचं कारण आहे दूरदर्शनवर बनलेले मीम्स. सध्या सोशल मीडियावर मीम्सच्या ट्रेंडची चलती आहे. एरवी कोणत्याही बाबतीत हसण्याची-हसवण्याची संधी न सोडणारे नेटकरी ही संधी दवडतील तरच नवल. त्यामुळे दूरदर्शनवरही या निमित्ताने अनेक मीम्स बनले. ते प्रचंड व्हायरल झाले. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याप्रमाणेच यंदा दूरदर्शनच्या नावाचीही चांगलीच चर्चा रंगली. पाहुयात दूरदर्शनवरचे काही निवडक मीम्स.

आपली प्रतिक्रिया द्या