काँग्रेसचा खोटारडेपणा आनंदराज आंबेडकरांनी केला उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसचा खोटारडेपणा उघड केला आहे. दिल्लीत आपण कुठल्याच पक्षाला पाठिंबा जाहीर केला नाही, तसेच दिल्लीत आपले उमेदवारच दिले नसल्याचे आनंदराज यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांचा दिल्लीत काँग्रेसला पाठींबा

आनंदराज आंबेडकर यांनी दिल्ली काँग्रेसला पाठिंबा जाहीर करून दिल्लीतील उमेदवार मागे घेतल्याचे काँग्रेस नेत्या शीला दिक्षित यांनी जाहीर केले होते. यावर आनंदराज आंबेडकर यांनी नाराजी दर्शवली असून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच दिल्लीत आमची ताकद नाही, दिल्लीत आपण कुठलाच उमेदवार दिला नसल्याचे स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिले आहे. तर दिल्लीचं युनिट बरखास्त करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे.