
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस असिस्टंट या पदासाठी होणाऱ्या नोकरभरतीसाठी शिवसेना स्थानीय लोकाधिकार समितीकडून प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्थानीय लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण वर्ग पार पडणार आहेत.
या प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आठ ते दहा दिवसांचा राहणार आहे. ज्या उमेदवारांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी शिवसेना भवन येथे 15 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत शरद एक्के 9892699215, श्रीराम विश्वासराव 9869588469, विलास जाधव 9619118999, सुधाकर नर – 8369442951 यांच्याशी सायंकाळी 5 ते 8.30 या वेळेत नोंदणीसाठी संपर्क साधावा असे आवाहन महासंघाचे संघटक सचिव व प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांनी केले आहे.
मराठी भाषा दिवस, शिवराय संचलन रविवारी बैठक
मराठी भाषा दिवस व शिवराय संचलनाच्या नियोजनासाठी 14 फेब्रुवारी रोजी होणारी बैठक अपरिहार्य कारणांमुळे रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता रविवार 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना भवन येथे होणार आहे. या सभेसाठी महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी केले आहे.




























































